सावित्री फाउंडेशन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य करते. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, मार्गदर्शन यासारख्या सुविधांची मदत केली जाते. याशिवाय, डॉ. स्वप्नील शिरोळे यांचा आणखी एक मोठा उद्देश म्हणजे एक तांत्रिक शाळा उभारणे, जिथे सर्व विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उच्च दर्जाचे आयटी शिक्षण उपलब्ध होईल. या शाळेत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान मिळून, त्यांचे भविष्यातील रोजगार संधी अधिक उज्ज्वल होतील.
डॉ. शिरोळे हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे, आरोग्य सेवांमध्ये सावित्री फाउंडेशनने मोठे योगदान दिले आहे. निरोगी जीवनासाठी त्यांनी विविध आरोग्य शिबिरे, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. फाउंडेशन नियमितपणे नेत्रदान आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करते, ज्यामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत मिळते. कोविड-19 महामारीच्या काळात सावित्री फाउंडेशनने मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले, जसे की औषधे, अन्न आणि आरोग्य सेवा पुरवणे, तसेच गरजू लोकांना वैद्यकीय मदत देणे.
फाउंडेशन पूरपरिस्थितीतील मदतकार्य, साप्ताह, कीर्तन-भजन यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करून वृद्धांना मनोरंजनाची संधी उपलब्ध करून देते. तसेच, समाजातील विविध सामाजिक मुद्द्यांवर काम करून, ते एकात्मता आणि विकासाला प्रोत्साहन देतात. सावित्री फाउंडेशनचे हे विविध कार्य समाजातील सर्व स्तरांवर सकारात्मक प्रभाव पाडत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांना शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समर्थन मिळत आहे, ज्यामुळे समाज अधिक सशक्त आणि समृद्ध होत आहे.
पर्यावरण संरक्षण हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, कारण पर्यावरणाचा ऱ्हास आपल्या जीवनावर आणि भविष्यातील पिढ्यांवर गंभीर परिणाम करू शकतो. सावित्री फाउंडेशन पर्यावरण संरक्षणासाठी पुढील विविध उपक्रम राबवते: वृक्षारोपण अभियान, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली.
कौशल्य विकास हे समाजातील प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर आणि सक्षम बनवण्यासाठी आवश्यक आहे. सावित्री फाउंडेशनच्या माध्यमातून, कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राबवून व्यक्तींचे आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगाराची संधी वाढवता येईल. फाउंडेशन CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) आणि PMEGP (Prime Minister’s Employment Generation Programme) यासारख्या सरकारी योजना समर्थ करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.